Pune News : नेमकं चाललंय काय? ऐतिहासिक शनिवारवाड्यात सापडल्या 450 दारूच्या बाटल्या

एमपीसी न्यूज – पुण्याची ऐतिहासिक ओळख असणा-या शनिवारवाड्यातून 450 दारूच्या बाटल्या आणि तब्बल 25 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. पुणे पॉलगर्स यांनी नुकतेच याठिकाणी प्लॉगिंग मोहिम राबविली त्यात हा कचरा गोळा करण्यात आला आहे.

शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी येणारे लोक वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य पाहण्यासाठी येतात की पार्टी करण्यासाठी येतात असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होत आहे. पर्यावरण पूरक उपक्रम राबवित नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संकल्प पुणे प्लॉगर्सच्या वतीने करण्यात आला व शनिवार वाड्यात प्लॉगिंग मोहिम राबविली. यामध्ये जवळपास 80 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

शनिवाड्यातून 450 दारूच्या बाटल्या आणि 25 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. अशाच प्रकारची मोहिम हनुमान टेकडी आणि सिंहगड किल्यावरती राबविण्यात आली तिथून देखील असाच कचरा गोळा केल्याचे माहिमेत सहभागी स्वयंसेवकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.