Pimpri News : 5.25 लाखांची ब्राऊन शुगर जवळ बाळगणा-या महिलेला अटक, म्हसोबा मंदिराजवळील घटना 

एमपीसी न्यूज – विक्री करण्याच्या उद्देशाने 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची 105 ग्रॅम ब्राऊन शुगर जवळ बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक केली आहे. सोमवारी (दि.11) गुरुदत्त नगर, म्हसोबा मंदिराजवळ अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

माया दिलीप रणदिवे (वय 45, रा. भारत नगर, पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला) असे अटक आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक महिलेनं विक्री करण्याच्या उद्देशाने 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची 105 ग्रॅम ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ जवळ बाळगला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून महिलेला अटक केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.