Chinchwad News : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासूवर खूनी हल्ला, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात सत्तुरीने वार केला. सासु मध्ये आल्यावर तिच्याही डोक्यात वार करुन जखमी केले. आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.11) दुपारी आहेर गार्डन शेजारी वाल्हेकर वाडी येथे ही घटना घडली. 

पत्नी रुपाली गायकवाड, सासू मंगल दळवी अशी जखमींची नावे असून, दोघींवर उपचार सुरू आहेत. सुभाष नामदेव गायकवाड (वय 40, रा. शिरुर) असे अटक आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात सत्तुरीने वार केला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या सासुच्या देखील डोक्यात व हातावर वार करुन दोघींना गंभीर जखमी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी अटक असून, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुदळे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.