Maharashtra Schools : शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी; नवे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरु

एमपीसी न्यूज : राज्यातील शाळांना 2 मेपासून सुट्टी तर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सत्राची सुरुवात हे 13 जून रोजीच होईल आणि त्याच दिवशी विदर्भाचा अपवाद वगळता राज्यातील इतर भागातील सर्व शाळा सुरू होतील विदर्भातील शाळा 27 जून रोजी सुरू होतील, असे आदेश आज शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

राज्यातील शाळा एप्रिल महिनाअखेरपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता त्यावर आता शालेय शिक्षण विभागाने आपला खुलासा केला आहे. त्यात विभागाने शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने सुट्टी घेण्याची मुभा दिली आहे.

तर दुसरीकडे इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल 30 एप्रिल, रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत शक्य झाला नसल्यास त्यानंतरही लावण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र हा निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी शाळांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या आदेशाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.