Police Medal : अभिमानास्पद! महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा

एमपीसी न्यूज – पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, 7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 939 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), 189 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत.

देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी – कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे –

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)

  • विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र
  • प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट 6, धुळे
  • चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे
  • अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड

राज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

  • गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  • महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
  • संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार
  • भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक
  • दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार
  • निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार
  • संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.