Dehuroad : पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून पतीला मारहाण
एमपीसी न्यूज – पत्नी तिच्या प्रियकरासोबत घरात बसल्याचे पाहिले. याचा जाब विचारणा-या पतीला पत्नी आणि तिच्या प्रियकराने जबर मारहाण केली. यामध्ये पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी अकराच्या सुमारास शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.
सलीम रजाक सय्यद असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाहनाज सय्यद आणि सचिन कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम यांची पत्नी शाहनाज तिचा प्रियकर सचिन याच्यासोबत घरात बसली होती. त्या दोघांना पती सलीम यांनी पाहिले. याचा सलीम यांनी पत्नीला जाब विचारला.
यावरून चिडलेल्या पत्नीने सलीम यांना लोखंडी बादलीने आणि सचिन याने दगडाने मारहाण केली. यामध्ये सलीम गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.