Pune : जास्त परताव्याच्या आमिषाने आठ जणांची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मल्टी लेव्हल स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे सांगून एकूण आठ जणांची तब्बल साडेतीन लाखांना फसवणूक केली. याप्रकरणी एका 54 वर्षीय पुरुषाने फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात मोबाईल व बँकेचे खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 मार्च ते 5 मे या दरम्यान घडला.

फिर्यादी यांच्या मित्राने फिर्यादी यांना फोनवरून E-Dolomiti नावाची एक मल्टी लेव्हल (एमएलएम) स्किम असून यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर दर आठवड्याला 5 टक्के रकम परतावा मिळतो, असे सांगून व्हॉट्सअपवर माहितीपत्र पाठविले. त्या कंपनीच्या वेबसाईवर जय एन्टरप्रायझेस या नावाने पैसे पाठवावे, अशी माहिती नमूद केली होती. त्यानुसार, फिर्यादी यांनी तब्बल एक लाख पाच हजार रुपये पाठविले. तसेच त्यांच्या इतर सात सहका-यांनी मिळून 2 लाख 49 हजार 990 रुपये कंपनीत गुंतविले.

मात्र, काही काळाने ही वेबसाईट बंद पडली. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या सहका-यांची तीन लाख 54 हजार 990 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.