Bhosari : गोवा सरकारकडून व्यावसायिकाची 21 लाखांची फसवणूक; कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या दाखविले आमिष

एमपीसी न्यूज – गोवा सरकारकडून कन्स्ट्रक्शनचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची सुमारे 21 लाख 8 हजार 158 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2015 ते जुलै 2019 या कालावधीत भोसरी येथे घडली.

विनायक पंढरीनाथ भोंगाळे (वय 58, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हनुमंत श्रीपती नाणेकर (वय 55, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत याने विनायक यांना गोवा सरकारकडून कन्स्ट्रक्शन काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याप्रमाणे काम मिळवून दिले. त्यासाठी हनुमंत याने विनायक यांच्याकडून अर्नेस्ट मनी डिपॉजिट, बँक गॅरंटी म्हणून 21 लाख 8 हजार 158 रुपये घेतले. विनायक यांनी मिळालेले काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिलेले पैसे परत देणे अपेक्षित असताना हनुमंत याने त्या पैशांचा अपहार करून विनायक यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.