Pimpri: ‘होम ‘क्वॉरंटाईन’वर देखरेख ठेवण्यासाठी 100 ‘जलद प्रतिसाद टीम’

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 169 नागरिकांना घरीच ‘क्वॉरंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. हे नागरिक घरातच आहेत का, बाहेर फिरत नाहीत नाही, योग्य काळजी घेतात का, यावर देखरेख ठेवण्यासाठी 100 ‘जलद प्रतिसाद टिम’ची स्थापना करण्यात आली आहे. दोन महापालिका कर्मचारी, पोलिसांचा समावेश असलेली ही टीम त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहे. त्या घरांना भेट देणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात 9 रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आहेत. त्यांच्यावर ‘आयसोलेशन’ कक्षात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दहा जणांचे अहवाल ‘निगेटीव्ह’ आले आहेत. आजपर्यंत 72 जण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. 72 जणांचे नमुने तपासणीला पाठविले होते. त्यापैकी 64 जणांचे अहवाल आले आहेत. आठ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

परदेशातून आलेल्या ‘होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यातील 23 जणांनी 14 दिवस ‘होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये पूर्ण केले आहेत. ‘होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये असलेल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी 100 जलद प्रतिसाद टीमची स्थापना करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन कर्मचारी कार्यरत राहतील. ज्या भागात नागरिकांना ‘होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये ठेवले आहे. त्या घरी भेट देणे, नागरिक घरातच आहेत का, बाहेर फिरत नाहीत नाही, योग्य काळजी घेतात का, यावर देखरेख  ठेवण्याची जबाबदारी या टीमवर असणार आहे. या नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे काम ही टीम करणार आहे. त्या भागातील दैनंदिन स्वच्छता करणे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले चीन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी, अरेबिया, युनायटेड स्टेट्स या देशातून आलेल्या नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच  ‘क्वॉरंटाईन’मध्ये रहावे.
idsp.mkcl.org या संकेतस्थळावर कोरोना बाधितांची माहिती द्यावी.

# आयटी कंपन्यांनी कर्मचा-यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी. तसा पत्रव्यवहार केला आहे. नागरिकांनी निकटची गरज असेल तरच बाहेर पडावे ‘क्वॉरंटाईन’साठी अतिरिक्त 130 बेडची सुविधा उपलब्ध कार्यालये, घरातील टेबल, शौचालये सातत्याने स्वच्छ करावे.

8888006666 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. शाळा, मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, क्रीडांगणे, उद्याने बंद केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.