Lonavala : लाॅकडाऊन: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 19 वाहने जप्त

एमपीसी न्यूज – वरसोली टोलनाका, कुसगाव व पवनानगर परिसरात संचारबंदीचे उल्लंघन करून खुलेआम फिरणार्‍या 19 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. 18 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचा यामध्ये समावेश आहे.

कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून नाकाबंदी करत विनाकारण घराबाहेर पडणार्‍यावर कारवाई मोहीम सुरू केली आहे.

तसेच कुसगाव व ओळकाईवाडी या संवेदनशील भागात पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्यासह 18 कर्मचारी, सी. आय. डी.चे 1 अधिकारी 5 कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे 1 अधिकारी 12 कर्मचारी व 5 होमगार्ड यांनी संचलन करत नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.