Rohit Pawar Meets Sonu Sood: मजुरांना घरी पोहोचवणाऱ्या सोनू सूदची रोहित पवारांनी घेतली भेट

Rohit Pawar met Sonu Sood, who helps migrant workers to sent home

एमपीसी न्यूज- गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद अहोरात्र स्थलांतरित मजुरांसाठी झटत आहे. त्यांना आपापल्या गावी पाठवण्यासाठी परिश्रम घेत आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही सोनू सूदच्या या कामाचे मनापासून कौतुक करत त्याची भेट घेतली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सोनू सूदची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. ‘घर जाना हैं’, हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

सोनूचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. या कोरोनाकाळात त्याच्या या दिलदारीची रोहित पवार यांनी भरभरुन प्रशंसा केली आहे.


दरम्यान, सोनू सूदने आतापर्यंत विविध मार्गाने गरजूंची मदत केली आहे. मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी त्याने बसची सेवा सुरु केली होती. तसंच रमजानच्या महिन्यात त्याने अनेकांना जेवण उपलब्ध करुन दिलं होतं.

विशेष म्हणजे इतक्यावरच न थांबता त्याने त्याचे हॉटेलदेखील डॉक्टर, पोलीस यांच्यासाठी खुले केले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी सोनूच्या कार्याची दखल घेतली आहे.

त्यामुळे पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात नायक ठरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.