Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी एक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
Another police is corona positive from Pimpri-Chinchwad Police Commissionerate
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी एका पोलिसाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 10 झाली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट आज (बुधवारी) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या 10 झाली आहे.
त्यातील 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 49 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे.
महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर, मोशीतील 60 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1373 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.