Pune: महापौरांच्या संपर्कातील अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख होम क्वारंटाइन; हडपसरमधील माजी महापौरांनाही कोरोना

Pune: Additional Commissioner, head of health officer who is in touch with Mayor are Home Quarantine; Corona also to the former mayor of Hadapsar महापौरांच्या संपर्कातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता 'वर्क फॉर्म होम' सुरू केले आहेत.

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्याने संपर्कात आलेल्या अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख सध्या होम क्वारंटाइन आहेत. त्यांच्यामध्ये काही लक्षणे आढळून आली तर 3 दिवसांत त्यांची कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील सुरुवातीला 8 आणि नंतर 5 असे 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील 5 जण उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. इतर, 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हडपसरमधील राष्ट्रवादीच्या माजी महापौरांनाही कोरोना झाला आहे. त्यांच्या कुटुंबातीलही काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महापौरांच्या संपर्कातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता ‘वर्क फॉर्म होम’ सुरू केले आहेत. पुणेकरांवरील कोरोनाचे संकट कमी होण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ रात्रंदिवस काम करीत होते. महापौर बंगल्यावर सातत्याने बैठका होत होत्या.

महापौरांना कोरोना होण्याच्या आधीही अशीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांमध्ये आता घबराट निर्माण झाली आहे. जीवावर उधार होऊन पुणे महापालिकेचे अधिकारी काम करीत आहेत.

पुणे महापालिकेतील नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेत्या यांनाही कोरोना झाला होता. उपमहापौर यांच्या घरातील व्यक्तीलाही लागण झाली होती.

पुणे कन्टोन्मेंट, वडगावशेरी, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवक आणि त्यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. तातडीने वेळीच उपचार घेतल्याने या नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनावर मात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.