SC Amendment : वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा ; सर्वोच्च न्यालयाचा ऐतिहासिक निर्णय
Daughter's equal share in father's property; Historic decision of the Supreme Court
एमपीसी न्यूज – वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यालयाने अंतिम निर्णय दिला आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं सर्वोच्च न्यालयाने स्पष्ट केले आहे.
आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे 2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.
आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा निर्णय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
न्यायमुर्ती मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीचं असते’
मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण 2005 सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला.
आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकतात.