Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. सिंह राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

सिंह : शत्रूवर विजय, प्रवासात लाभ

सिंह रास ही राशीचक्रातील पाचवी रास असून या राशीचे चिन्ह सिंह असे आहे. ही अग्नी तत्वाची रास आहे. स्थिर स्वभावाची अल्प प्रसव राशी असून या राशीचा स्वामी रवि असून ही वंध्याराशी आहे. या राशीच्या व्यक्तीजळ प्रचंड आत्मविश्‍वास व स्वाभिमान असतो.

तेजस्वीपणा, चमकदार, आकर्षकता व भव्यता ही आपल्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहे. आपण स्वातंत्र्य प्रिय आहात. आपणास कोणाच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बोल अथवा हुकूमत आपण सहन करणार नाही. तर वेळ पडल्याच आपण आपले स्वत:चे विचार काही कल्पना असतात.

तत्व व स्वत्व जपण्याकडे आपला कल जास्त असतो. आपल्या कुळाबद्दल व परिवारामधील व्यक्तीवर पूर्वजनावर व परंपरेवर आपणास अभिमान असतो. आपण घरातील व्यक्ती, मित्र परिवार सहकार्य असणारे व्यक्ती आपणास इतर व्यक्तीपेक्षा वेगळी वागणूक द्यावी मग आपण त्या व्यक्तीबद्दल दिलदार राहाल.

कितीही अडचणी आल्या तर त्या व्यक्तीबद्दल दिलदार राहाल. कितीही अडचणी आल्या तर त्या व्यक्तीबद्दल ठाम  राहाल. तर माझे व्यक्तीमत्व आपले मन विशाल व उदार असते. वेळ प्रसंगी नातेवाईक मित्रपरिवार व अडचणी असणार्‍या व्यक्तींना आपण मुक्तपणे मदत करता.

आपली स्तुती, वाहवा लोकांनी करावी असे मनोमन वाटते. आपली उत्सुकता, स्पष्टवक्तेपणा, बद्धीचा योग्य वापर करून आपण यश खेचून आणता व त्यामुळे आपण लोकप्रिय होऊ समाजात रुबाबदार व्यक्तीमत्व म्हणून गणला जाता.

सिंहराशीमध्ये मधा, पूर्वा व उत्तरा ही तीन नक्षत्रे येतात. सिंह रास मघा नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचे गुण मान, उद्योगी, सेवासंपन्न, अत्याधुनिक उतावळे कोणत्याही गोष्टीची पटकन अनुमान, कर्तृतत्ववान, नोकरचाकर, खूप ठेवणार्‍या धनवान, उद्योगशील, बलवान, गर्विष्ठ, विलक्षण साहसी, जगप्रसिद्ध असतात.

यांचे शरीर मजबूत व हे लोक देशभक्त व पितृभक्त असतात. पूर्वा नक्षत्र असणारा मनुष्य दानशूर प्रिय भाषिणी, चपळ किर्तीमान, श्रद्धावान, राजसेवक, तालीमबाज व सत्वगुणी असतो. प्रवासाची आवड, नाट्यकलांची, पैसे व ऐश्‍वर्याची आवड असते.

ह्या नक्षत्रातील व्यक्ती धनाढ्य व्यापारी आढळतात. तर उत्तरा नक्षत्र हे मानी व मेहनती आहे. परिवार व वाहन याचे सौख्य मिळवणारो कला कौशल्य यामध्ये आवड असणारे असते.

अशा सिह राशीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

सिंह राशीच्या पष्ठ स्थानी गुरुचे भ्रमण 5 एप्रिल 2020 पर्यंत असून नंतर सफल स्थानी होणार आहे. या वर्षी आरोग्यासाठी जास्त खर्च करावा लागेल. शत्रूवर मोठा विजय प्राप्त होईल. कोर्टकचेरी वाद विवादामध्ये आपली सरशी होईल.

तरूण व्यक्तींना नवीन नोकरी व परदेशी काम मिळेल. मोठे कर्ज मिळेल. मात्र उत्पन्नात वाढ होणयसाठी नवीन योजना आमलात आणाल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मान, सन्मान व मोठ्या पदाची प्राप्ती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

विवाह इच्छुकांचे विवाह एप्रिल 2021 नंतर ठरतील अथवा होतील. मनासारख्या घटना घडतील. नातेवाईक, छोटे प्रवास यांच्यामधून लाभ संभवतो. कला/खेळ/स्पर्धा यामध्ये यश मिळेल.

शनिचे भ्रमण सहाव्या स्थानातून होत असून ते स्वराशीतील असल्यामुळे आपणास कायदेशीर कामात यश, शत्रुवर विजय, निवडणुका / कोर्टकचेरीमध्ये मोठे यश मिळेल. नोकरीमध्ये चांगले स्थृैर्य मिळेल. आरोग्याच्या समस्या कमी होतील. नोकर चाकर यांचे सहकार्य उत्तम राहील.

जुन्या गोष्टीमधून फायदा होईल. प्रवास करताना दक्षता घ्यावी लागेल. अडथळे अथवा प्रवासात अडचणी येतील. राशीच्या दशम व चतुर्थ स्थानातून राहू केतूचे भ्रमण होत असल्यामुळे नोकरी व्यवसायात नवीन बदल कराल. काही वेळा गोंधळाची स्थिती निर्माण होईल.

नोकरीत बदल व बदली घरापासून लांब अथवा दूर होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. तसेच नवीन वर्षात अनपेक्षितपणे नवीन संधी उपलब्ध होतील. नावीन्यपूर्ण शिक्षण होईल. संशोधनात्मक शिक्षणात यश मिळेल.

अचानक तीर्थ यात्रा / प्रवास करावा लागेल. एकंदरीत वर्षाच्या उत्तरार्धानंतर शेअर व्यवसायात व आर्थिक दृष्टीने यशदायक राहील.

उपासना : सूर्य उपासना, मार्तंड भैरवची उपासना केल्यास उत्तम राहील. तर सफधान्य व बदाम यांचे दान केल्यास नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतील.

शुभरंग : नारंगी, सोनेरी

भाग्यरत्न : पवाळ व डायमंड

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28

भाग्यकारक वयोवर्षे : 25, 31, 35, 39, 45, 54

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.