Nigdi news: उपेक्षितांचं अंतरंग काव्यातून मांडत क्रांती लढा उभारणारे आत्माराम पाटील हे एकमेव शाहीर –  अंबादास तावरे

एमपीसी न्यूज – मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या लेखणीतून उपेक्षितांचे अंतरंग मांडत क्रांती लढा उभारण्याची ताकद आत्माराम पाटील यांच्या साहित्यात होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहिरी अभ्यासक शाहीर अंबादास तावरे यांनी केले.

सोलापूर येथील ज्ञानमंगल प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या व लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिलेल्या “शाहीरमहर्षी आत्माराम पाटील “या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, लेखक सोपान खुडे, विजय जगताप, लेणी अभ्यासक अजित देशपांडे, प्रा. गोरख ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते.

अंबादास तावरे पुढे म्हणाले, आत्माराम पाटील यांना शाहिरी रचनेबरोबरच संगीताचीही जाण होती. पारंपारिक चालीची प्रथा मोडून त्यांनी आपल्या काव्याला पोवाडा असेल किंवा शाहिरीतील कवणे यांना संगीतकार म्हणून महात्म्य निर्माण केल्याचे म्हटले. याप्रसंगी सोपान खुडे, विजय जगताप ,लक्ष्मण रानवडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

आत्माराम पाटील यांच्यावरील पुस्तक लिहिण्यामागची भावना व प्रेरणा लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संविधान दिन सोहळा समितीचे प्रमुख विष्णू मांजरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.