Talegaon Dabhade :श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर
एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथीचे औचित्य साधून तेली समाज तळेगाव दाभाडे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळा चौकातील श्री विठ्ठल मूर्तीचा अभिषेक करून श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे महेंद्र विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. तसेच तेली समाज मारुती मंदिर येथे देखील प्रतिमेची पूजा करण्यात आली.
यावेळी तळेगाव तेली समाज व आरोग्य सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी समाजाचे विश्वस्त देवेंद्र बारमुख, कमलाकर क्षीरसागर व इतर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी समाजातील 50 बंधू-भगिनींनी रक्तदान करून प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये पिंपरी लॉजिकल अटीट्युड ऑफ ब्लड बँकेचे डॉ. पाटील, त्यांचे सहकारी अजय कुंजीर व तुषार जगदाळे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन वैभव कोतुळकर, संजय कसाबी, सुजित लोखंडे, प्रदीप टेकवडे आदींनी केले.