Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,289 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 95.26 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 289 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 लाख 32 हजार 294 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26 टक्के झाले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 1 हजार 948 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 28 हजार 347 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला 43 हजार 701 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. आजची रुग्ण वाढ दोन हजारांहून कमी आहे तर, बरे होणा-या रुग्णांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.