Pune case: चरस, एमडीची तस्करी करणारे पती पत्नी अटकेत

एमपीसी न्यूज: पुण्याच्या कोथरुड परिसरातून चरस एमडी या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पती पत्नीला पुणे पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ही कारवाई केली. या जोडप्याकडून तब्बल साडे तेरा लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. होंडा सिटीकारमधून ते अमली पदार्थ विक्री करण्यास आल्याचे समोर आले आहे.

मोहम्मदअफजल अब्दुलसत्तार नागोरी (वय ४०, रा. मुंबई) आणि पत्नी शबाना मोहम्मदअफजल नागोरी (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोथरुड परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका होंडासिटी कारमध्ये महिलेसह व ६ वर्षांच्या चिमुकलीसह बसल्याचे दिसून आले. परंतु, तो पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समजाच त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याने कुटूंबासोबत आल्याचे सांगितले. तरीही पोलीसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मोहम्मदअफजल याची चौकशी करत त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ८ लाख ४० हजार रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला ताब्यात घेत त्याची पत्नी शबाना हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिच्याकडे ५ लाख रुपयांचा चरस मिळून आले. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

मोहम्मदअफजल हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला जून महिन्यात पुणे पोलीसांनीच अमली पदार्थ प्रकरणात पकडले होते. त्यानंतर तो दोन महिने जेलमध्ये होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थ विकण्यास सुरूवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.