Pune Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, 20 किलो गांजा जप्त
एमपीसी न्यूज – पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार लाख 78 हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा (Pune Crime News) जप्त करण्यात आलाय. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश रमेश बेले (वय 24) आणि कुमार अनिल नितळे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ravet : अज्ञात चोरट्याने चोरली रोडवर पार्क केलीली रिक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना कदमवाक वस्ती परिसरात दोघेजण गांजा (Pune Crime News) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता एका पिशवीत 20 किलो दोनशे ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.