Pune : भरधाव वेगात कार चालवून बस थांब्याचे नुकसान
एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने भरधाव वेगात कार चालवून (Pune) कारने बस थांब्याला धडक देऊन बस थांब्याचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वडमुखवाडी, येथील बालाजी मंदिर बस थांब्यावर घडली.
बाळासाहेब कांताराम पठारे (वय 50, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल शिवकांत भालके (वय 27, रा. खराडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alandi : वेदश्री तपोवनामधील रक्तदान शिबिरामध्ये 207 जणांचे रक्तदान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल भालके याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 12/क्यूडब्ल्यू 8350) आळंदी कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात चालवली. बालाजी मंदिर बस थांब्याला (Pune) त्याने जोरात धडक दिली. यामुळे त्याच्या स्वताच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण झाला. तसेच बस थांब्याचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.