Wanwadi : वानवडीत किरकोळ कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला
एमपीसी न्यूज – रिजवान शेख आणि त्याच्या साथीदारांनी (Wanwadi ) किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. हडपसर येथील आनंदनगर परिसरातील सभेला हॉटेल जवळ 30 ऑगस्ट च्या रात्री हा प्रकार घडला. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.