Pune : बिबवेवाडीत लागलेल्या आगीत महिला बचत गटाचा कारखाना भस्मसात
एमपीसी न्यूज- महिला बचत गटाच्या मसाला कांडप कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना जळून भस्मसात झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही
ही आग इतकी भीषण होती की काही समजण्याच्या आतच हा संपूर्ण कारखाना जाळून भस्मसात झाला. सोबतच या कारखान्याशेजारी असणारे फर्निचर व प्लायवूडचे दोन कारखानेसुद्धा आगीत जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत संपूर्ण कारखाना जाळून गेला होता.