Pune District News : नको म्हणत असतानाही खेळायला गेला, 10 वर्षीय चिमुरड्याला पित्याची जबर मारहाण

एमपीसी न्यूज – नको म्हणत असतानाही खेळण्यासाठी घराबाहेर गेल्याने संतप्त झालेल्या एका पित्याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलाला जबर मारहाण केली.पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 49 वर्षीय पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादवी कलम 326 व बालक संरक्षण अधिनियम कायदा 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हे कुटूंब वडकी गावातील माऊली नगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान, त्याचे वडील दहा वर्षांच्या मुलाला बाहेर खेळण्यास जाऊ नको असे सांगून बाहेर गेले होते.परंतु, वडील बाहेर जाताच मुलगा घरातून बाहेर खेळण्यास गेला.वडील परत आल्यानंतर त्यांना ही बाब समजली.त्यांनी रागाच्याभरात त्याला पीव्हीसी पाईपने जबर मारहाण केली. यात चिमुकला जखमी झाला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.