Bhosari News : मारहाण करून चाकूचा धाक दाखवत 13 वर्षीय मुलाला लुटले

एमपीसी न्यूज – तीन अनोळखी चोरट्यांनी तेरा वर्षीय मुलाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कालीमाता मंदिरासमोर इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

सन्‍तलाल रामजीलाल सिंग (वय 53, रा. कालीमाता मंदिराजवळ इंद्रायणीनगर भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अगस्थिया सिंग (वय 13) हा घराच्या बाहेर चालत जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका मोपेड दुचाकीवरील तीन चोरट्यांनी अगस्तीया याला मारहाण केली. त्यानंतर चाकूसारखे हत्यार दाखवून त्याच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस हवालदार किशोर वाव्हळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.