Hinjewadi News : आसाम विद्यापीठाची बनावट एमबीएची डिग्री देणाऱ्या दोघांवर तर डिग्री घेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आसाम डाऊन टाऊन युनिव्हर्सिटीची एमबीए अभ्यासक्रमाची बनावट डिग्री देणाऱ्या दोघांवर तर डिग्री घेणाऱ्या तिघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिग्री देणाऱ्या दोघांनी बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून तिघांना डिग्री दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सन 2013 ते 24 एप्रिल 2021 या कालावधीत बावधन येथे घडला.

संदीपा प्रमोद जाना (वय 38, रा. कोथरूड, पुणे), सागर मापारी, देबोराह जोसेफ, नंदा देबोराह जोसेफ (दोघे रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश), करमदीप कौर (रा. मॅदेस्टरीक ईलम सिटी, क्लासबर्ग एमडीयुएएस) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत आरोपी संदीपा हिचे पती प्रमोद बालाजी जाना (वय 44, रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीपा सन 2013 मध्ये बावधन येथील युटीएस ग्लोबल येथे नोकरी करत होती. त्यावेळी तिची ओळख कंपनीत काम करणारा तिचा सहकारी आरोपी सागर मापारी याच्यासोबत झाली. त्यांनी मिळून आसाम डाऊन टाऊन युनिव्हर्सिटी आसाम या विद्यापीठाची एमबीएची डिग्री आणि प्रमाणपत्र बनावट सही, शिक्के वापरून बनवली.

ती डिग्री आणि प्रमाणपत्रे त्यांनी इतर आरोपींना दिली. संदीपा हिच्या मोबाईल फोनमध्ये याचे पुरावे मिळाल्यानंतर पती प्रमोद यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.