Pune News : गजबजलेल्या टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा, रस्त्यावर झोपून वाहने अडवली

एमपीसी न्यूज : पुण्यातील वर्दळीच्या टिळक रस्त्यावर मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका तरुणीने चांगलाच धिंगाणा घातला. या तरुणीने भर रस्त्यामध्ये झोपून वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. 

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या तरुणीने हिराबाग चौकात मद्यधुंद अवस्थेत येत वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन या तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला रस्त्यातून बाजूला केले.

मात्र सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र गजबजलेल्या टिळक रस्त्यावरच या तरुणीने अशाप्रकारे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याने सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.