Bhosari News : भोसरी येथून अल्पवयीन मुलीस फुस पळविले

एमपीसी न्यूज – भोसरी येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविल्याची घटना 9 ऑगस्टला घडली. त्याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने 17 ऑगस्टला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रितेश रणखांबे, (रा. नेहरूनगर, पिंपरी, अंदाजे वय 20) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांची मुलगी 16 वर्षे 7 महिने हिला बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथून 9 ऑगस्टला सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान आरोपीने कशाचे तरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांच्या कायदेशीर राखवालीतून पळवून नेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.