Crime News : चारचाकीला जाण्यासाठी जागा न दिल्याने पीएमपी चालकाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाहतूक कोंडी असताना चारचाकी चालकाला जाण्यासाठी जागा न दिल्याने चौघांनी मिळून पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केली.पुण्यातील शंकर शेठ रस्त्यावर हा प्रकार घडला.खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.पीएमपी चालक लक्ष्मण सुभाष धुमाळ (वय 41) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

कविता राजेश कटके, निखिल राजेश कटके, नितीन जयपाल कटके यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने पुण्याच्या मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.आळंदी ते स्वारगेट या मार्गावरून पीएमपी बस स्वारगेटच्या दिशेने जात होती.यावेळी शंकरशेठ रस्त्यावरील मिरा सोसायटीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

या वाहतूक कोंडीतून चार चाकी वाहनाला जाण्यासाठी जागा न दिल्याने चालक निखिल कटके यांनी पीएमपी चालक धुमाळ आणि वाहक अतुल कुलकर्णी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. निखिल कटके आणि त्याचे साथीदार पीएमपी बसमध्ये शिरले आणि त्यांनी कठीण वस्तूने या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.बसमधून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.