Pimpri News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आप’चे आंदोलन

एमपीसी न्यूज – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बॅरिकेड्स तोडत, सीसीटीव्ही कॅमेरे फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने आज (गुरुवारी) आंदोलन केले.

आपचे शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राज चाकणे, स्वप्नील जेवेळे, एकनाथ पाठक, अॅड. गौतम कुडुक, प्रकाश हगवणे, मोतीराम अगरवाल, अॅड. उमेश साठे, भीम मागाडे, अशोक कोठावळे, सरोज कदम, उमेश थोरात, डॉ. योगेश बाफना, ब्राम्हनंद जाधव, मुकेश पोखरकर, निखिल बालीघाटे, आशुतोष शेळके, चांद्रमनी जावळे, स्मिता पवार, शिव बोटे, शंकर पवार आदी सहभागी झाले होते.

चेतन बेंद्रे म्हणाले, ”दिल्ली पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा कवच तोडून, सीसीटीवी व इतर संसाधनांची नासधूस करत मुख्यमंत्र्यांच्या जीवितास घातपात करण्याचा प्रयत्न केला. याची आम्ही निंदा करतो. भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही. म्हणून ते त्यांच्यावर हल्ला केला जात आहे. कालची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला केजरीवाल यांना संपवायचे आहे. हल्ल्याची कृती म्हणजे भाजपने विचारांच्या लढाईत पराभव स्वीकारल्याचे लक्षण आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.