Bhosari News : इंद्रायणीनगर येथील फुटपाथवरील टप-या, पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने भोसरी इंद्रायणीनगर येथील रोडलगतच्या फुटपाथवरील 16 टप-या, 12 अनधिकृत पत्राशेडवर आणि 41 हातगाड्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली आज (गुरुवारी) कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या वतीने दररोज शहराच्या विविध भागातील अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे. भोसरी, इंद्रायणीनगर येथील फुटपाथवरील 16 टप-या, 12 अनधिकृत पत्राशेडवर आणि 41 हातगाड्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नयेत. तसेच फुटपाथच्या स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या मोहिमेत अतिक्रमण निरीक्षक संतोष शिरसाट, बीट निरिक्षक प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, सुपरवाझयर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथक, पोलीस पथक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.