Akurdi: शैक्षणिक संकुल की डेंगू अळी उत्पत्ती केंद्र?; डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारात सापडल्या डेंगूच्या अळ्या

महापालिकेने ठोठावला पाच हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगूच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाविद्यालयाला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या आवारात विविध ठिकाणी पाणी साचले आहे. टाक्यांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज (मंगळवारी) पाहणी केली असता या साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगूच्या अळ्या सापडल्या. कॅम्पसमध्ये अनेक ठिकाणी डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी सांगितले.

  • शहरातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी तपासणी करावी – डॉ. रॉय
    आकुर्डीतील डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयात आज तपासणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी या साचलेल्या पाण्यामध्ये डेंगूच्या अळ्या सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या संस्थेत हलगर्जीपण योग्य नाही. यामुळे अनेकांना डेंगूची लागण होत आहे. त्यांनी अळ्या नष्ट कराव्यात. त्याचबरोबर शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी परिसराची तपासणी करावी. डेंगूच्या अळ्यांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करावेत. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.