Akurdi : शिवीगाळीचा जाब विचारणा-या तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. तसेच तरुणाच्या दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना आकुर्डी येथे मंगळवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

अमरदीप आसाराम परदेशी (वय 28, रा. सावली हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 10) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय खुळे (वय 25) आणि ओंकार काळभोर (वय 25, दोघेही रा. आकुर्डीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी हे त्यांचे मित्र अनिकेत पाटील व अनिल फरांदे यांच्याशी आकुर्डी येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यामुळे परदेशी यांनी ‘शिवीगाळ का करता?’, अशी विचारणा केली. यावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीवरही दगड मारून सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.