Akurdi : आकुर्डी येथे तीन दुकाने फोडली!

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे तीन दुकाने फोडल्याचा प्रकार आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना मध्यरात्री आकुर्डी येथील तुळजाईवस्ती येथे घडली आहे.

तुळजाईवस्ती आकुर्डी येथे तीन दुकाने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोडलेल्या दुकानांमध्ये सलून, फायनान्स आणि झेरॉक्सच्या दुकानांचा समावेश आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुकानातून काय आणि किती ऐवज चोरी झाला?, याचा तपास सुरू आहे. चोरट्यांनी दुकानांचे शटर अर्ध्यापर्यंत उचकटून आत प्रवेश केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.