Alandi : गीता भक्ति अमृत महोत्सव स्थळी आग

एमपीसी न्यूज – आळंदी येथे सुरू असलेल्या गीता भक्ती(Alandi) अमृत महोत्सव स्थळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Alandi)आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सव सुरू आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून मान्यवर उपस्थित राहत आहेत. भव्य सभामंडप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.

Alandi: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतले माऊलीं संजीवन समाधीचे दर्शन

रविवारी सायंकाळी या सभा मंडपाच्या समोर अचानक आग लागली. हवा सुरू असल्यामुळे आग पसरू लागली होती. आग लागताच दिघी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र आगीमुळे मंडपाचे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.