Alandi: 150 कलाकारांच्या सुंदर अभिनयाने साकारले महानाट्य ” यह पुण्य प्रवाह हमारा “

एमपीसी न्यूज – आळंदी येथे सुरू असलेल्या परमपूज्य(Alandi) स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  ‘गीता अमृत महोत्सवात काल 9 फेब्रुवारी रोजी 150 कलाकारांचा सहभाग असलेले महा नृत्य नाट्य  ” यह पुण्य  प्रवाह हमारा ” दहा हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांसमोर सादर करून आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.

डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी चे कुलपती डाॅ. पी.डी.पाटील यांच्या (Alandi)प्रेरणेने व सहकार्याने डाॅ.डी.वाय.पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, पिंपरी यांच्या वतीने हे नृत्य नाट्य सादर करण्यात आले.

या नृत्य नाट्याचे संपूर्ण दिग्दर्शन डाॅ.डी वाय.पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स चे संचालक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी केले होते. भारतातील संतांवर आधारित हा  कार्यक्रम होता.

Pune : कृत्रिम बुद्धीमत्तेला गांधींच्या सर्जनशील विचारांची जोड द्यावी- डॉ. विवेक सावंत

 

यात श्री शंकराचार्य,  श्री वल्लभाचारय , संत गुलाबराव, संत नरसी मेहता,  संत तुलसीदास, संत मिराबाई, संत सुरदास , संत कबीर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , श्री समर्थ रामदास अशा अनेक संतां चे दर्शन घडविण्यात आले. याचे कथा लेखन गिरीश डागा व क्षितिज मोहपात्रा यांनी केले.

 

या संपूर्ण महोत्सवास मालपाणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे संचालक श्री संजय मालपाणी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमा ची प्रस्तावना व आभार प्रदर्शन ही श्री संजय मालपाणी यांनी केले.  शहरात प्रथमच अशा प्रकार चे महानाट्य सादर झाले. कार्यक्रम पाहून भक्ती भावाने  प्रेक्षक तल्लीन झाले.भारावून गेले. स्वामी श्री गोविंद देव गिरी जी महाराज यांनी डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांचा सत्कार करून सर्व कलाकारांचे कौतुक केले .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.