Alandi News : मालकाच्या ऑफिसमधून नोकराने चोरले दोन लाख रूपये

एमपीसी न्यूज – मालकाच्या ऑफिसमधून नोकराने दोन लाख रूपये चोरी केले. आळंदी बेस कँम्प, हवेली येथील साईटवरील

डमीन ऑफिसमधून 20 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाल्याचे उडकीस आले.

चंदन रमाशंकर पंडीत (वय 34, रा. आळंदी बेस कँम्प, हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून योगेश कुमार इंदरसिंग (वय 31,  रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश कुमार इंदरसिंग हा फिर्यादी यांच्या कंपनीचे मालक सुनील शिवाजीराव भोसले यांचा नोकर आहे. आरोपी योगेशने साईटवरील अँडमीन ऑफिसच्या ड्रावरमधून दोन लाख रूपये चोरी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.