Pune Crime News : वानवडीत घरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञात व्यक्तीने जाळली

एमपीसी न्यूज : पुण्याच्या वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची तीन चाकी रिक्षा अज्ञात व्यक्तीने जाळली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दहा मार्च रोजी हांडेवाडी रोड हडपसर येथील चिंतामणी नगर मध्ये हा प्रकार घडला.

वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा रियाज शेख (वय 31) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुस्तफा शेख यांची तीन चाकी रिक्षा आहे. त्यांनी चिंतामणी नगर येथील मेव्हण्याच्या घराजवळ ही रिक्षा मागील दोन महिन्यांपासून पार्क केली होती.

दरम्यान 10 मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून ही रिक्षा पेटवून दिली. त्यामध्ये संपूर्ण रिक्षा जळाली असून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.