Annabhau Sathe : अण्णाभाऊ हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व -प्रा. डॉ. धनंजय भिसे

एमपीसी न्यूज : दापोडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) शतकोत्तर जयंती समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास कांबळे होते. प्रकाशतात्या जवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वास्तवतेचे भान ठेवून जे समोर दिसेल त्यानुसारच वास्तविकतेला कल्पकतेची जोड देऊन शोषित, पिडीत, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, श्रमिक यांच्या वेदनेचा हुंकार, आक्रोश जनतेपुढे, समाजापुढे आपल्या लेखनीतून मांडत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी म्हटले की, ”अण्णाभाऊ साठे हे शिकलेले नव्हते, पण त्यांनी शिकलेल्यांना लाजवेल असे सामाजिक कार्य जनतेसमोर ठेवलेले आहे.”

Sindhu Seva Dal : सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी यांची निवड

त्यांचे अनुकरण केले किंवा प्रेरणा घेतली तरी आपण आपले जीवन यशस्वी करु शकतो. अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्या खेड्यात झाला. ते स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईला गेले. तेथे झोपडपट्टीत राहीले आणि कामगार चळवळ सुरू करुन त्यांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी लढा सुरू केला. अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 14 कथा, 13 नाट्यकृती, पोवाडे, गवळण, कवणं, प्रवास वर्णने असे विपुल साहित्य निर्मिती केली आहे, असे प्रा.डॉ. धनंजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर अनिकेत काटे, माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे आणि कालीदास कांबळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन आबा कोळेकर यांनी आभार मानले. संतोष घुले यांनी निवेदन केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत उर्फ आबासाहेब कोळेकर, रामदास भांडे, अॅड मुकुंद ओव्हाळ यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.