Pune News : साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवणावरून वाद, तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील खडकी परिसरात साखरपुड्याच्या कार्यक्रमातील जेवणावरून झालेल्या वादानंतर एका महिलेसह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. 

याप्रकरणी गौरी सईद शेख (वय 22, रा. महात्मा गांधी वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहिदा शेख, शाहरुख नबु शेख, शौकत नबु शेख, मोहसीन निसार खान, निसार जंगु खान, यासीन खान, शबाना खान, अशिफ शेरू शेख आणि रुकसाना शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. यातील शौकत नबु शेख आणि निसार जंबू खान या दोघांना पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी शेजारी राहण्यास आहे. 20 फेब्रुवारी रोजी आरोपी रुकसाना शेख यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. फिर्यादी कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यक्रमाला गेले होते. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर फिर्यादीचे पती जेवण करण्यासाठी गेले असता जेवण संपत आले होते.

त्यावेळी आरोपी आसिफ शेरू शेख हा त्या ठिकाणी आला आणि “थाली तेरे लिये चाटणे को रखा है, तुझे खाणे को नही मिळता तू चाट” असे म्हणाला यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर वर नमूद केलेल्या आरोपींनी फिर्यादी सह तिघांना बेदम मारहाण केली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.