Pune News : बसमध्ये जेष्ठ महिलांचे दागिने लंपास करणा-या सराईताला अटक

एमपीसी न्यूज : पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन जेष्ठ महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच्याकडून ४ लाख ९२ हजारांचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संतोष शरणाप्पा जाधव (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरातील विविध भागातून पीएमपीएल बसमध्ये प्रवास करताना महिलांच्या दागिन्यांची चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होती.

त्यावेळी मुंढवा परिसरातील एका बसस्थानकात संशयित सातत्याने चढउतार करीत असल्याचे पोलीस हवालदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी संतोषला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वानवडी, स्वारगेट, दत्तवाडी हद्दीतून जाणा-या पीएमपीएल बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख ९२ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.