Crime News : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दोघांकडून सुमारे 19 लाख रुपये घेऊऩ फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला. रावेत पोलिसांनी (Crime News)  तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

विनोद शंकर पवार (वय 33), सागर शंकर पवार (वय 25), सुयोग किशोर चव्हाण (वय 27, तिघे रा. काळेवाडी), दीपेश शर्मा, राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि.17) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News : लग्नाच्या आमिषाने तरुणीसोबत सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला खाद्य निगम विभागात नोकरी लावतो असे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी (Crime News) टप्प्याटप्प्यात आरोपींनी 18 लाख 97 हजार रुपये घेतले. खोटे जॉइनिंग लेटर देऊन दोघांची फसवणूक केली. पोलिसांनी विनोद पवार, सागर पवार, सुयोग चव्हाण या तिघांना अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.