23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Ashadhi Wari 2022 : यळकोट.. यळकोट…जय मल्हार! माऊलींच्या पालखीचे जेजूरीसाठी प्रस्थान, वारकऱ्यांकडून मल्हारी मार्तंड खंडोबा नामाचा जयघोष

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – सासवड येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज जेजूरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाच्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वारकऱ्यांनी सासवड सोडताच यळकोट.. यळकोट…जय मल्हारचा जयघोष सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. भक्तीचे असे हे अनोखे प्रांजळ रूप सध्या सर्वच भाविक माऊलींच्या पालखी सोहळ्यात (Ashadhi Wari 2022) अनुभवत आहेत. 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचा (Ashadhi Wari 2022) गेले दोन दिवस सोपान काकाच्या सासवडमध्ये मुक्काम होता, आज पालखीने जेजूरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल यवत येथे मुक्कामी होता, त्यानंतर वरवंड येथे पालखीचा मुक्काम होणार आहे.

Sinhagad landslide : सिंहगड येथे कोसळली दरड; तरुणाचा मृत्यू

सायंकाळी पाच वाजेपर्यंत माऊलींच्या पालखीचे जेजूरीत आगमन होणार आहे. पालखीमार्गावरील कमानीजवळ जेजूरीवासींयांकडून वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळला जाणार असून पालखी मल्हारी मार्तंड खंडेरायांच्या भंडाऱ्यात एकरूप झाल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान पालखी जेजूरीला पोहोचल्यानंतर आजचा पालखी मुक्काम जेजूरी येथेच असणार आहे.

spot_img
Latest news
Related news