23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Ashadhi Wari : दिवेघाटात वारकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंची फुगडी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी सासवड मुक्कामी (Ashadhi Wari) पोहोचली. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे.

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली होती. यावेळी पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह वाढला होता. तसेच स्थानिक नागरिकांनीही माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

 

Ashadhi Wari : पोलीस आयुक्त बनले वारकरी, सपत्नीक घेतले दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दरवर्षी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. या वर्षी देखील त्या वडकी नाला येथून वारीत सहभागी झाल्या.

 

त्यानंतर अवघड असा दिवे घाट पार करत त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी देखील खेळली. त्यांची छानशी फुगडी चर्चेचा विषय बनली आहे.

यंदा त्यांनी महिलांसोबत वटपौर्णिमाही साजरी केली. त्यावेळीही त्या चर्चेत (Ashadhi Wari) आल्या होत्या.

spot_img
Latest news
Related news