23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Ashadhi Wari : पोलीस आयुक्त बनले वारकरी, सपत्नीक घेतले दर्शन

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : दोन वर्षांनंतर झालेल्या (Ashadhi Wari) श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यंदा उत्साही अन भक्तीने नाहून निघाला. पुण्यनगरीत पालख्यांचे दिमाखात स्वागत झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सपत्नीक दर्शन घेऊन वाढपी बनून वारकऱ्यांची सेवा केली.


तर, पत्नीसोबत वारकऱ्यांच्या पंगतीला बसून प्रसादही घेतला. यावेळी पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हेही उपस्थित होते.


पोलीस आयुक्तांनी गळ्यात टाळ घेऊन अंभागाचे बोल देखील गायले. तर शुक्रवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिवेघाटात जाऊन माऊलींच्या पालखीचे दर्शन (Ashadhi Wari) घेतले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सपत्नीक संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचेही दर्शन घेतले.

spot_img
Latest news
Related news