Indapur News : उसतोड कामगारांजवळ सापडली प्राणघातक हत्यारे, चौघांना अटक

एमपीसी न्यूज : इंदापूर तालुक्यातील आबाकरे वस्ती येथे ऊसतोड कामगारांच्या घरात प्राणघातक हत्यारे सापडली आहेत. इंदापूर पोलिसांनी छापा टाकून ही सर्व हत्यारे जप्त केली आहेत. पोलिसांनी ४ ऊसतोड कामगारांना अटक केली. 

शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ सकटया उर्फ चिटू विकास काळे, नितीन विकास काळे, जितेंद्र भारत चव्हाण,अर्जुन विकास काळे ( सर्व.रा.भांबूरे ता.कर्जत जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे ऊसतोड मजूर कर्जत तालुक्यातील भांबुरे येथील असून मागील दोन महिन्यापासून ऊस तोडणीसाठी येथे आले होते. या सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यातील आरोपी शक्ती उर्फ शक्तिमान याने स्वतःच्या एक वर्षीय मुलीचा खून केला होता त्याच्याविरोधात याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वय गुन्हे दाखल केले आहेत. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

आरोपींमधील शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ सकटया उर्फ चिटू विकास काळे( रा. भांबूरे ता. कर्जत जि.अहमदनगर ) याने २३ डिसेंबर रोजी आपल्या 1 वर्षीय पोटच्या मुलीला नाकतोंड दाबून जीवे मारले होते. नंतर तो फरार झाला होता. इंदापूर पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर नितीन काळे याच्यावरही कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.