Pune News : पुण्यात आयुर्वेदिक  दवाखान्यात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : आयुर्वेदिक दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे. संबंधित डॉक्टरने महिलेला तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. ही घटना काल सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी डॉ. मंदार रमेश अत्रे (वय ४८, रा. अमृतसिद्धी सोसायटी, कर्वेनगर)  असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमध्ये डॉ. मंदारचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. काल सकाळी एक महिला दवाखान्यात काम आहे का, असे विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. मंदारने संधी साधून तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो, असे म्हणत महिलेच्या अंगाला स्पर्श केला. त्यानंतर त्याने ड्रॉव्हरमधील पैसे दाखवून महिलेला दुपारी दीड वाजता येता का अशी विचारणा करीत विनयभंग केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1