India Corona Update : मागील 24 तासांत 26,624 नवे रुग्ण, 29,690 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 26 हजार 624 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 29 हजार 690 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 31 हजार 223 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 95 लाख 80 हजार 402 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 05 हजार 344 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 45 हजार 477 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.50 टक्के एवढं झाले आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 11 लाख 98 हजार 195 नमूने तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी(दि.19) त्यापैकी 11 लाख 07 हजार 681 नमूने तपासण्यात आले आहेत. घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या तूलनेत वाढ झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 

देशातील 33 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 20 हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णापैकी 40 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या 61,095 तर, केरळमध्ये 59,043 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.