Pune News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचल्या बारबाला, कोरोना नियमांची ऐशीतैशी

एमपीसी न्यूज : पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील वडारवाडी याठिकाणी एका लग्न मांडवात चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यातील रुग्ण संख्या काहीशी कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतु असं असलं तरीही काही जणांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. त्याचं हे उदाहरण म्हणजे चक्क रस्त्यावर टाकलेल्या मांडवामध्ये बारबाला नाचवल्याचा प्रकार घडला आहे .

वडारवाडी परिसरात रस्त्यावरच हा लग्नाचा मांडव टाकण्यात आला आहे. याठिकाणी मोठमोठ्याने गाणी लावून बारबालांना नाचवण्यात आले. तर त्यांच्यावर पैसे देखील उधळण्यात आल्याचे उघडकीस आला आहे. भर रस्त्यात हा कार्यक्रम होत असल्याने रस्त्यावर बारबाला नाचण्यास पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे का? असा प्रश्न संतप्त पुणेकर विचारत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.