Bhosari : चोरट्याने उघड्या दरवाजावाटे मोबाईसह कागदपत्रे पळविली

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने दोन मोबाईल आणि इतर कागदपत्रे चोरून नेली. ही घटना गवळीनगर, भोसरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

वैभव ज्ञानेश्‍वर कराळे (वय 22, रा. गवळीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान फिर्यादी कराळे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून आतील सुमारे 35 हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल व इतर कागदपत्रे चोरून नेली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.